App

महिंद्रा आणि महिंद्रा समुहाचे कृष-ई हे प्रसिध्द कृषी ॲप आहे जे तुम्हाला तुमच्या शेतीसाठी वैयक्तिक पिक वेळापत्रक आणि मौल्यवान शेतीविषयक माहिती जसे जमीन तयार करणे, पीक पेरणी, पीक नियोजन, खत व्यवस्थापन, बीज प्रक्रिया , कीड व रोग व्यवस्थापन, शेती औजारे, निदान आणि पिक समस्यांवर उपाय , तण नियंत्रण आणि सिंचन इत्यादी वैयक्तिकरित्या पुरवते. हे ॲप ८ प्रसिध्द भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून हे कृषी ॲप तुमच्या शेताचे उत्पादन वाढविण्यासाठी अग्रक्रमाचे तंत्रज्ञान साधन आहे.

कृष-ई च्या वैयक्तिक उपायांच्या सामर्थ्याद्वारे तुमच्या पिकाचे उत्पादन वाढवा:

  • - तुमच्या सर्व शेतीविषयक गरजांसाठी वैयक्तिक पिक वेळापत्रक
  • - आमची वैज्ञानिक कृषी सल्ला सेवा ; शेतकऱ्यांकडून मोफत
  • - त्वरित निराकरणासाठी प्रिमियम सल्ला सेवा
  • - तज्ञांसह सामुदायिक अध्ययन
  • - वैयक्तिक डिजिटल डायरी जी तुमच्या सर्व शेतीविषयक खर्चांचे व्यवस्थापन करण्यासाठी गणकयंत्रा सारखे काम करते.
  • - ॲप आणि कृषी सल्ला सेवा या इंग्रजी, हिंदी, मराठी, तेलगु, कन्नड, तामिळ, गुजराती आणि पंजाबी भाषांमध्ये उपलब्ध आहेत.
App

डिजिटल कृषी उपायायोजनां द्वारे पिकांवर प्रादुर्भाव करणाऱ्या किडी व रोगांना ओळखण्याचे आव्हान पेलण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांना सशक्त करणे हे कृष-ई चे ध्येय आहे.

कृष-ई निदान हे आमच्या मालकीच्या समस्या सोडविण्याची पद्धती आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे वापरले जाणारे उपयोगी साधन आहे जे शेतकऱ्यांना पिकावरील रोगांचे निदान करणे आणि छायाचित्र सुपुर्द करून त्वरित उपाय मिळवण्यासाठी मदत करू शकते

हे तुम्ही जाणू इच्छिता की कोणत्या किडी आणि रोगांचा तुमच्या पिकावर प्रादुर्भाव झाला आहे? तुमचे पिकाला कोणत्या पोषण द्रव्याची कमतरता आहे? तुमच्या पिकाचे छायाचित्र अपलोड करून आमच्या डिजिटल कृषी सल्ल्यासह या सर्व समस्यांवर त्वरित उपाय मिळवा. कृष-ई निदान हा तुमच्या पिकांसाठी परिपूर्ण आरोग्य भागीदार आहे आणि तो तुम्हाला योग्य निदान आणि वैज्ञानिक उपाय पुरवतो. वेळेवर किडी आणि रोगांची ओळख करून तुमच्या पिकाची उत्पादकता वाढवा .

 Rental Partner App
Krishe Rental App

कृष-ई रेंटल पार्टनर ॲप

कृष-ई रेंटल पार्टनर ॲप ही शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेती समजून घेऊन भाडेतत्वाचे उद्योजक होण्याची अद्वितीय संधी आहे. आमचे डिजिटल कृषी उपाय कृष-ई स्मार्ट किट आणि जमीन तयार करण्यापासून ते पिक कापणीपर्यंत आधुनिक शेती यंत्रे सादर करतात. डिजिटल कृषी उपायांसहित हा भाडेतत्वाचा व्यवसाय हा डिजिटल कृषी उपाय देण्यासहीत त्यांचे संपर्क व उत्पन्न वाढविणार व अखंडपणे त्यांच्या ऑर्डर्सचा मागोवा घेणार .

शेतकरी कृष-ई सहायकाशी संपर्क करून किंवा कृष-ई केंद्रांना भेट देऊन शेतकरी ही यंत्रे मिळवू शकतात. आम्ही १५+ ट्रॅक्टर ब्रॅन्ड्ससाठी सहाय्य पुरवतो आणि भाडेतत्वावर कृषी यंत्रांचे व्यापक विकल्प उपलब्ध आहेत. आम्ही ज्या शेतकर्यांकडे त्यांच्या मालकीची कृषी उपकरणे/ शेती अवजारे आहेत त्यांना नवीन डिजिटल युगाचे भाडेतत्वाचे उद्योजक करून त्यांच्या उपकरणांचा उपयोग आणि उत्पन्न वाढवून डिजिटल कृषी सेवेसह नवीन डिजिटल युगाच्या कृषी उद्योजकांना सशक्त बनवतो.

आपल्या शेतात ई-क्रांतीचा आनंद घेण्यासाठी कृषी-ई शेतीचा मार्ग मिळवा!
आमच्या सहाय्यकाशी बोलण्यासाठी आणि बुकिंग करण्यासाठी 1800-266-1555 वर कॉल करा.

कृष-ई सोबत मोठे व्हा

कृष-ई ने लाखो यशस्वी शेतकरी निर्माण करण्यासाठी नव्या युगाला सुरूवात केली आहे

भारतीय कृषीचे रूप बदलण्यासाठी, लाखो शेतकर्‍यांना त्यांच्या शेतजमीनीमधून उत्तम उत्पादकता आणि नफा प्राप्त करण्यासाठी पुढे नेण्याचे ध्येय कृष-ई ने ठेवले आहे.

कैलास मोरे गाव - पूरी

जिल्हा - औरंगाबाद

श्री. कैलास मोरे, कृष- ई तकनिक प्लॉटचे शेतकरी, हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्हामधील आहेत. ८ महिन्यांपूर्वी, त्यांनी त्यांच्या पिकासाठी कृष- ई ऊसाचे डिजिटल कॅलेंडरचा स्वीकार केला. कृष- ई सल्ला आणि अ‍ॅप सहाय्यासह, सध्या त्यांच्या ऊसाच्या पिकाच्या गाठीचा आकार ७.५ इंच आणि घेराचा आकार ३.५ इंचांचा आहे. यामुळे जमीन तयार करणे, बियाणांची निवड करणे, बियाणांवर उपचार करणे आणि यांसारख्या अनेक चांगल्या पिक व्यवस्थापन पध्दतींना योगदान दिले गेले, ज्यामुळे मागच्या वर्षाशी तुलना करता त्यांना मशागतीच्या खर्चामध्ये १२% बचत करण्यात मदत झाली.

अंकुश दोडमिसे गाव - सादोबाचीवाडी बारामती

जिल्हा - पुणे

पुण्यामधील सादोबाचीवाडी बारामती या गावामधील, श्री. अंकुश दोडमिसे हे एक प्रगती करत राहणारे शेतकरी आहेत, ज्यांनी त्यांच्या पिकाची निगा राखण्यासाठी कृष- ई ऊसाच्या डिजिटल सल्ल्याचा वापर केला. ते आपल्या जमीन तयार करणे, बियाणांची निवड करणे, बियाणांवर उपचार करणे, ह्युमिक + फॉस्फोरीक आम्लाचे ड्रेंडींग्ज यांसारखे आपले आवर्ती हस्तक्षेप पाहिले. या सर्व तंत्रांच्या मदतीने, सध्या त्यांच्याकडे चांगल्या संख्येने म्हणजेच अंदाजे ७-८ फुटवे आहेत, परिणामी त्यामधून त्यांना ८०% अंकूरण मिळत आहे.

दारा प्रताप सिंह रघुबंशी गाव - ग्रेटीया

जिल्हा - छिंदवारा

श्री. दारा प्रताप रघुबंशी हे छिंदवारा, मध्यप्रदेशामधील ग्रेटीया तहशिल-चौराही गावामधील सुधारक शेतकरी आहेत ज्यांनी कृष- ई संघाच्या मदतीने यांत्रिकीकरण पध्दतींचा स्वीकार केला. न्यूमॅटीक प्लांटर्सचा वापर केल्यामुळे चांगली खोलवर पेरणी झाली आणि बियाणे ते बियाणे आणि ओळ ते ओळ यांमध्ये अचूक अंतर सोडले गेले. हे एकसारखे अंकूरण आणि घटलेला खर्च यांच्या परिणामी संकरेत मक्यांच्या बियांचे उत्पादन झाले.

हेमंत वर्मा गाव - हातोडा

जिल्हा - छिंदवारा

हेमंत वर्मा यांना भेटा. हे मध्यप्रदेशातील हातोडा गावामधील वृध्दी-अभिमुख शेतकरी आहेत. कृष- ई संघाचे उपाय आणि मार्गदर्शनासह, त्यांनी कृष- ई च्या जमीन तयार करणे आणि कापणीसारख्या कृषि शास्त्रीय पध्दतींचा स्वीकार केला. या पध्दतींचा वापर केलयमुळे त्यांच्या पिकांची वाढ चांगली झाली आणि ते गेल्या वर्षीशी तुलना करता अधिक उत्पादनाची अपेक्षा करत आहेत.

मनोजभाई गणेशभाई भेसादडिया गाव - मोती बानुगर

जिल्हा - जामनगर

सुरूवातीला, श्री. मनोजभाई गणेशभाई बेसादडिया पारंपारिक पध्दतींचा वापर करून शेतजमीनीची मशागत करत, पूर सिंचनाचा वापर करत आणि त्यांचा रासायनिक खते वापरण्याच्या प्रमाणावर कोणतेही नियंत्रण नव्हते, परिणामी त्यांचा मशागत खर्च वाढत होता. पण त्यांची नवीन आणि नाविण्यपूर्ण पध्दती स्वीकरण्याची मनोवृत्ती आणि त्या शिकण्याच्या इच्छेमुळे गोष्टी त्यांच्यासाठी अनुकूल झाल्या. कृष- ई संघाची मदत आणि मार्गदर्शनामुळे, त्यांनी आता एमआयएस स्थापित केले आहे आणि ते कृष- ई च्या सहयोगाने केव्हीके पिक निगा संघाद्वारे पुरवलेल्या कृषी सेवांवर आधारित कापसाशी मशागतही करत आहेत.

रमेशभाई गोर्धनभाई चोवातिया गाव - मोटा थावारीया

जिल्हा - जामनगर

पारंपारिक पध्दती आणि सिंचन पध्दतींचा वापर करून, श्री. रमेशभाई गोर्धनभाई चोवातिया यांचे रासायनिक खतांच्या वापरावर नियंत्रण नव्हते परिणामी मशागतीचा खर्च वाढला. आणखी, पाऊस आणि जल स्त्रोतांच्या कमतरतेमुळे कापसाचे उत्पादन अपेक्षेहून कमी झाले. कापसाच्या पिकांची मशागत कशी केली जावी, रासायनिक आणि पाण्यात विद्राव्य खतांचा विविधप्रकारे वापर यांबाबत मिळालेले स्पष्ट ज्ञान, आणि कृष- ई संघाकडून वेळो वेळी शेतजमीनीला दिलेल्या भेटी, यांमुळे ते आता त्यांची कापसाची मशागत आणि गुंतवणूकीवरील त्यांना मिळणारा परतावा यांसह खूप खूश आहेत.

पेनुगांती पापाराव गाव - येंदागंटी

जिल्हा - पश्चिम गोदावरी

आंध्रप्रदेशातील येंदागंटी गावामधील श्री. पेनुगंटी पापाराव हे प्रगतीच्या शोधात असलेले शेतकरी आहेत जे आधुनिक कृषी पध्दतींचा वापर करतात. कृष- ई संघाच्या मदतेने, त्यांनी मॅट नर्सरी पध्दतीच्या जोडीने त्यांच्या शेतजमीनीमध्ये भाताच्या लावणीच्या यांत्रिक पध्दतींचा यशस्वीपणे स्वीकार केला. परिणामी - त्यांचे उत्पादन ३५२५ किग्रॅ/एकरांपासून ते ३७५० किग्रॅ/एकर इतके वाढले.