शेती हा अथक परिश्रम आणि आपल्या शेतकर्यांच्या उत्कटतेवर उभा असलेला भारतातील प्रबळ व्यवसाय आहे आणि पूर्वजांचा वारसा आहे. १९६० ची ‘हरित क्रांती’ ही आधुनिक यांत्रिकीकरण आणि वैज्ञानिकरित्या उत्कृष्ट पिक भरणसामग्रीसह शेतीची उत्पादकता वाढवण्याचा पहिला प्रयत्न होता. शेतकर्यांची प्रगती झाली आणि भारत मुख्य पिकांवर स्वावलंबी बनला. १९७० चा कालखंड म्हणजेच ‘पांढर्या क्रांती’ ने शेतकर्यांच्या वृध्दीला आणखी चालना दिली आणि तिने भारताचे दुग्ध-कमतरता असलेल्या देशापासून जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक म्हणून रूपांतरित केले. याने दुग्ध व्यवसायाला भारताचा सर्वांत मोठा स्वावलंबी आणि ग्रामीण रोजगार निर्माता बनवले.
आज याच्या व्यवस्थेमध्ये सर्वात मोठा शेतकरी समुदाय आहे आणि जगामध्ये २ र्या क्रमांकाच्या सर्वाधिक जिरायत जमीनीच्या वैशिष्ट्यामुळे, भारत हा जगामधील सर्वांत मोठा अन्न उत्पादक आहे आणि नवीन युगाच्या सुरूवातीजवळ येवून ठेपला आहे.
आज, कृष- ई ने २०२० च्या ‘डिजिटल क्रांती’ चे अनावरण करून-भारतीय शेतकरी आणि भारतीय कृषीला पुढे नेण्यासाठीची मोठी झेप घेतली आहे. कृष- ई मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानासह प्रत्येक शेतजमीनीला रूपांतरित करणे, उत्पादकता वाढावणे आणि त्याद्वारे शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्याची शक्ती आहे. आम्ही याला ‘कृष- ई चा डिजिटल उदय’ असे म्हणतो.